बाळापूरचा आठवडी बाजार शनिवारऐवजी रविवारी
विधानसभा निवडणूक मतमोजणी
बाळापूरचा आठवडी बाजार शनिवारऐवजी रविवारी
अकोला, दि. 21 : विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी शनिवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी होणार असल्याने बाळापूर शहरातील शनिवारचा आठवडी बाजार रविवारी (२४ नोव्हेंबर) भरेल. तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केला.
मतमोजणीचा आणि बाळापूर शहरातील आठवडी बाजाराचा दिवस एकच आल्यामुळे बाजार दुस-या दिवशी भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवारी आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला आहे.
बाजारासाठी शहरात होणारी गर्दी, वाहतूक कोंडी, कायदे व सुव्यवस्था आदी बाबी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा