मतमोजणी व्यवस्था

मतमोजणी व्यवस्था

            मा.भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15/10/2024 रोजीच्‍या पत्रकार परिषदेव्‍दारे  महाराष्‍ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 कार्यक्रम केलेला असून सदर निवडणूक कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्‍ह्यातील 28-अकोट, 29-बाळापूर, 30-अकोला (पश्चिम), 31-अकोला (पूर्व) व 32-मुर्तिजापूर (अ.जा.) विधानसभा मतदार संघाकरीता दिनांक 20 नोव्‍हेंबर 2024  रोजी मतदान घेण्‍यात आले असून सदर मतदानाची मतमोजणी दिनांक 23 नोव्‍हेंबर 2024 रोजी ठीक सकाळी 8.०० वाजतापासून  सर्व संबंधीत मतदार संघाचे ठिकाणी करण्‍यात येणार आहे.

                        सकाळी ८.०० वाजता सर्वप्रथम टपाली मतपत्रिकांची मोजणी सुरु होणार असून सकाळी ८.३० वाजता पासून मतदान यंत्रावरील (CU) मतमोजणी सुरु होईल.

 

Ø झालेले मतदान:

                        महाराष्‍ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी अकोला जिल्‍ह्यातील 28-अकोट, 29-बाळापूर, 30-अकोला (पश्चिम), 31-अकोला (पूर्व) व 32-मुर्तिजापूर (अ.जा.) विधानसभा मतदार संघाकरीता दिनांक 20 नोव्‍हेंबर 2024  रोजी घेण्‍यात आलेल्‍या मतदान प्रकियेअंतर्गत झालेल्‍या मतदानाचा तपशील:

 

मतदार संघ क्रमांक व नाव

झालेले मतदानाची टक्‍केवारी

पुरुष

स्‍त्री

इतर

एकूण

टक्‍क्‍ेवारी

28-अकोट

११४२४८

९८४४२

२१२६९०

६८.३५

29-बाळापूर

११६२१२

१०२८०५

२१९०१८

७०.६०

30-अकोला (पश्चिम)

१०४८०९

९८५३१

२०३३४७

५७.९७

31-अकोला (पूर्व)

११४५९०

१०४२१८

२१८८११

६१.६०

32-मुर्तिजापूर (अ.जा.)

१०९८९८

९६८८३

२०६७८६

६६.५९

एकूण

५५९७५७

५००८७९

१६

१०६०६५२

६४.७६

 

Ø मतमोजणी केंद्राचे ठिकाण:

 

मतदार संघ क्रमांक व नाव

मतमोजणीचे ठिकाण

28-अकोट

गोदाम क्रमांक 5, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती परिसर, पोपटखेड रोड, अकोट

29-बाळापूर

शासकीय धान्‍य गोदाम क्रमांक 1, खामगाव रोड, बाळापूर

30-अकोला (पश्चिम)

शासकीय धान्‍य गोदाम क्रमांक 1,

जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला

31-अकोला (पूर्व)

शासकीय धान्‍य गोदाम क्रमांक 2,

जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला

32-मुर्तिजापूर (अ.जा.)

शासकीय धान्‍य गोदाम क्रमांक 5,

उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ, मुर्तिजापूर

Ø मतमोजणीची - टेबल संख्‍या, फेरी व कर्मचारी नियुक्‍तीबाबत :

 

मतदार संघ क्रमांक व नाव

EVMs वरील मतदानाच्‍या मोजणीकरीता टेबलची संख्‍या

टपाली मतपत्रिकांच्‍या मोजणीकरीता टेबलची संख्‍या

EVMs मतमोजणीच्‍या एकूण फेरींची संख्‍या

EVMs व टपाली मतपत्रिकांच्‍या  मतमोजणीकरीता नियुक्‍त अधिकारी/कर्मचारी वर्ग

28-अकोट

१४

२५

135

29-बाळापूर

१२

5

29

107

30-अकोला (पश्चिम)

१४

7

22

122

31-अकोला (पूर्व)

१४

7

26

122

32-मुर्तिजापूर (अ.जा.)

१४

8

28

126

 

612

 

                        वर नमुद केल्‍यानुसार मतमोजणी करण्‍यात येणा-या प्रत्‍येक टेबल वर 1-मतमोजणी पर्यवेक्षक, 1-मतमोजणी सहायक, 1-सुक्ष्‍म निरिक्षकाची नेमणूक करण्‍यात आलेली आहे.

v  पोलीस बंदोबस्‍त:

महाराष्‍ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत अकोला जिल्‍ह्यातील                    28-अकोट, 29-बाळापूर, 30-अकोला (पश्चिम), 31-अकोला (पूर्व) व 32-मुर्तिजापूर (अ.जा.) विधानसभा मतदार संघाकरीता १०१६ पेक्षा अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे.

त्‍याचप्रमाणे प्रत्‍येक मतदार संघाचे मतमोजणी केंद्राचे ठिकाणी 1-CAPF प्‍लाटून        1-SRPF प्‍लाटून नियुक्‍त करण्‍यात आलेले आहे.

प्रत्‍येक मतमोजणी केंद्राचे ठिकाणी त्रीस्‍तरीय बंदोबस्‍त लावण्‍यात आलेला असून मतमोजणी केंद्राचे ठिकाणी येणा-या प्रत्‍येक व्‍यक्‍तीस त्‍यांचे व्‍दारे तपासणी करुनच मतमोजणी केंद्रामध्‍ये प्रवेश दिला जाणार आहे. त्‍यामध्‍ये पहिला स्‍तर हा स्‍थानिक पोलीसांचा असून हा मतमोजणी केंद्राचे 100 मीटर अंतरावर राहील. दुसरा स्‍तर हा मतमोजणी कक्षाचे बाहेर प्रवेशव्‍दाराजवळ त्‍याठिकाणी राज्‍य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी कार्यरत राहतील तसेच तीसरा स्‍तर हा मतमोजणी कक्षाचे प्रवेश्‍व्‍दारावर राहणार त्‍याठिकाणी केंद्रीय सशस्‍त्र पोलीस दलाचे जवान कार्यरत राहणार आहेत.

सदर दुस-या व तीस-या स्‍तराचे ठिकाणी तपासणी करीता पोलीस विभागाकडून बसविण्‍यात आलेल्‍या Metal Detector तपासणी यंत्राव्‍दारे तपासणी करण्‍यात येईल.

 

v  मतमोजणी निरिक्षक :

मा.भारत निवडणूक आयोगाकडून दिनांक 23 नोव्‍हेंबर 2024 रोजी घेण्‍यात येणा-या मतमोजणीकरीता खालीलप्रमाणे मतमोजणी निरिक्षकांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे.

विधानसभा मतदार संघ क्रमांक व नाव

मा.निवडणूक निरीक्षक (सामान्‍य) यांचे नाव

28-अकोट

मा.श्री.उदयन मिश्रा, IAS

29-बाळापूर

मा.श्री.अमित कुमार, SCS

30-अकोला (पश्चिम)

मा.श्री.गिरीषा पी.एस., IAS

31-अकोला (पूर्व)

मा.श्रीरामुलू, SCS

32-मुर्तिजापूर (अ.जा.)

श्री.नरहरी सिंह बांगेर, IAS

 

v  VVPAT Slip ची मोजणी :

मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार प्रत्‍येक मतदार संघाचे ठिकाणी त्‍या मतदार संघातील एकूण मतदान केंद्रांपैकी सोडत पध्‍दतीने 5 मतदान केंद्रांची निवड करुन त्‍यावर झालेल्‍या मतदानाच्‍या VVPAT च्‍या Slip ची मोजणी सर्व EVM यंत्रांची मतमोजणी पूर्ण झाल्‍यानंतर करण्‍यात येणार आहे.

 

v  Media Centre & Communication Room :

मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार प्रत्‍येक मतमोजणी केंद्राचे ठिकाणी प्रसार माध्‍यमांना माहिती देण्‍याकरीता Media Centre स्‍थापन करण्‍यात आलेले आहे तसेच मतमोजणी विषयक माहिती देण्‍याकरीता Communication Room देखील स्‍थापन करण्‍यात आलेली आहे. मा.मुख्‍य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून अधिकृत प्राधिकार पत्र दिलेल्‍या माध्‍यम प्रतिनिधींना प्रवेश मिळेल.

 

v  मोबाईल वापरण्‍यास बंदी :

मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार मतमोजणीचे ठिकाणी मोबाईल व तत्‍सम उपकरणे वापरवर प्रतिबंध असून मतमोजणीचे ठिकाणी कोणालाही मोबाईल व तत्‍सम उपकरणांचा वापर करता येणार नाही. त्‍यामुळे मा.भरत निवडणूक आयोगाने मतमोजणीचे ठिकाणी मोबाईल वापरण्‍यास परवानगी दिलेले अधिकारी/कर्मचारी वगळता अन्‍य अधिकारी/कर्मचारी तसेच उमेदवार/प्रतिनिधी यांनी मतमोजणीचे ठिकाणी येताना मोबाईल सोबत आणू नये.

 

v  नमुना 17 सी भाग-1 बाबत  :

मतदानाचे दिवशी मतदान केंद्राध्‍यक्षाव्‍दारे उमेदवार/मतदान प्रतिनिधी यांना दिल्‍या गेलेल्‍या नोंदविलेल्‍या मतांचा हिशेब नमूद असलेला नमुना १७ सी-भाग 1 मतमोजणी प्रतिनिधी हे मतमोजणी कक्षामध्‍ये घेऊन येऊ शकतील. याव्‍यतिरिक्‍त त्‍यांना अन्‍य बाबी मतदान केंद्रामध्‍ये आणता येणार नाहीत.

 

वरीलप्रमाणे मतदार संघनिहाय सर्व मतमोजणीचे ठिकाणी कुठल्‍याही प्रकारचा अनुचीत प्रकार घडू नये तसेच घडल्‍यास तात्‍काळ उपाय योजना व्‍हाव्‍या याकरीता अग्‍नीशमन दल तसेच वैद्यकीय पथके नियुक्‍त करण्‍यात आलेली आहे.

त्‍याचप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर मतदानाकरीता वापरण्‍यात आलेली बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्‍हीव्‍हीपॅट स्‍लीप असलेल्‍या काळ्या लिफाफ्यांच्‍या सीलबंद पेट्या व संविधानिक लिफाफे असलेल्‍या सीलबंद पेट्या ह्या जिल्‍हा स्‍तरावर शासकीय धान्‍य गोदाम, जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे तयार करण्‍यात आलेल्‍या सुरक्षा कक्षाचे ठिकाणी सीलबंद करुन ठेवण्‍यात येणार आहेत. तसेच मतदानाकरीता वापरण्‍यात आलेल्‍या VVPATs ह्या महाराष्‍ट्र राज्‍य वखार महामंडळ, एमआयडीसी फेज-4, शिवणी, अकोला येथील सुरक्षा कक्षामध्‍ये सीलबंद करुन ठेवण्‍यात येतील. सदर यंत्रे व लिफाफे ठेवते वेळी तसेच सुरक्षा कक्ष सीलबंद करतेवेळी सर्व उमेदवार/प्रतिनिधी/राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी उप‍स्थित रहावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अकोला यांचेव्‍दारे करण्‍यात येत आहे.

 

अकोला जिल्‍ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्‍या ठिकाणी मतमोजणीची संपूर्ण तयारी झाली असून मतमोजणीकरीता संपूर्ण यंत्रणा सज्‍ज झाली आहे.

 

*******

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :