गत निवडणुकीपेक्षा मतदानात जवळजवळ सात टक्क्यांची वाढ

 


 

गत निवडणुकीपेक्षा मतदानात जवळजवळ सात टक्क्यांची वाढ                                                                                         जिल्ह्यात शांततेत विनातक्रार पार पडले मतदान

जिल्हाधिका-यांनी मानले मतदार व सर्व घटकांचे आभार

अकोला, दि. 21 : जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 20 नोव्हेंबर रोजी उत्साहात मतदान पार पडले. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी 6.96 टक्के अर्थात जवळजवळ सात टक्के इतकी वाढली आहे. पाचही मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याबद्दल जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी मतदार, राजकीय पक्ष, उमेदवार व निवडणुकीसाठी सहकार्य करणा-या विविध घटकांचे आभार मानले आहेत.

     

गेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 57.80 एवढी होती. यात सुमारे सात टक्के वाढ होत यावर्षी 64.76 टक्के मतदान झाले आहे. मतदानाच्या टक्केवारीत ही मोठी वाढ आहे. 

जिल्हाधिका-यांनी व्यक्त केले सर्वांचे आभार

मतदार जागृतीसाठी प्रशासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न, व्यापक जनजागृती ,‘स्वीप’ उपक्रमात राबवलेले अनेक अभिनव उपक्रम यामुळे मतदानात  वाढ झाली. ज्येष्ठ, महिला, तरूण, नवमतदार आदींनी मतदान प्रक्रियेत उत्साहात सहभाग घेतल्याने जिल्ह्यातील मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. मतदानात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. निवडणूक प्रक्रियेत मतदार, राजकीय पक्ष, निवडणूक प्रक्रियेत सहभागी सर्व यंत्रणा, विविध संस्था, सर्व घटक यांनी सहकार्य केले. त्यामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली, अशा शब्दांत जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. 

 

जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात 5 लाख 59 हजार 757 पुरूष, 5 लाख 879 महिला आणि इतर 16 अशा एकूण 10 लाख 60 हजार 652 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी 64.76 आहे.

   अकोट मतदारसंघात 68.35 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 14 हजार 248 पुरुष आणि 98 हजार 442 महिला, अशा एकूण 2 लाख 12 हजार 690 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

   बाळापूर मतदारसंघात 70.60 टक्के मतदान झाले. 1 लाख 16 हजार 212 पुरुष, 1 लाख 2 हजार 805 महिला आणि 1 इतर अशा एकूण 2 लाख 19 हजार 18 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

अकोला पश्चिम मतदारसंघात 57.97 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 4 हजार 809 पुरुष, 98 हजार 531 महिला आणि 7 इतर अशा एकूण 2 लाख 3 हजार 347 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

  अकोला पूर्व मतदारसंघात 61.60 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 14 हजार 590 पुरुष, 1 लाख 4 हजार 218 महिला, इतर 3 अशा एकूण 2 लाख 18 हजार 811 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

   मूर्तिजापूर मतदारसंघात 66.59 टक्के मतदान झाले. यात 1 लाख 9 हजार 898 पुरुष, 96 हजार 883 महिला, इतर 5 अशा एकूण 2 लाख 6 हजार 786 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

 000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :