तंबाखूमुक्त युवा अभियानाद्वारे जनजागृती

 तंबाखूमुक्त युवा अभियानाद्वारे जनजागृती

अकोला, दि. 25 :  जि. प. आरोग्य प्रशासनातर्फे जिल्ह्यात सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत तंबाखूमुक्त युवा अभियान राबविण्यात येत आहे. त्याद्वारे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ यांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती जि. प. विस्तार व माध्यम अधिकारी बाळासाहेब घुगे यांनी दिली.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होणारे मृत्यू कमी करणे हा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्यासाठी हे अभियान सभा, मेळावे, शाळा-महाविद्यालयांत कार्यक्रम, पोस्टर, जिंगल आदी विविध माध्यमांतून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

तंबाखू सेवनामुळे होणारे परिणाम

तंबाखूमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विकार होतात. तंबाखूच्‍या सेवनामुळे तोंडाचाघशाचाफुफ्फुसाचापोटाचाकिडनीचाकिंवा मूत्राशयाचा कर्करोग होऊ शकतो. भारतात तंबाखूच्‍या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग असलेल्‍या रूग्‍णांची संख्‍या सर्वांत मोठी आहे. 90 टक्क्यांपेक्षा जास्त फुफ्फुसाचा कर्करोग आणि इतर आजार होण्‍याचे कारण धूम्रपान आहे. तंबाखूमुळे ह्दय आणि रक्त वाहिन्‍यांचे विकारहृदयरोगछातीत दुखणेहदयविकाराच्‍या झटक्‍यामुळे अचानक मरण येणेस्ट्रोक (मेंदूचा विकार)पायाचा गँगरीन हे रोग होतात. तंबाखू हे क्षयरोग होण्‍याचे अप्रत्यक्ष कारण आहे. कधी-कधी धूम्रपान करणा-यांमध्ये देखील टीबीतीनपट अधिक आढळतो. सिगरेट किंवा बिड्यांचे धूम्रपानजितके अधिकतितके अधिक टीबीचे प्रचलन वाढू शकते. धूम्रपान, तंबाखूचे सेवन अचानक रक्तदाब वाढविते आणि हदयाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी करते. ह्यामुळे पायाकडे होणा-या रक्तप्रवाहात देखील कमतरता येते आणि पायात गँगरीन होऊ शकते. तंबाखू संपूर्ण शरीराच्या धमन्‍यांच्‍या पापुद्र्याला नुकसान पोहचवते. मुलांच्या आरोग्यावर धूम्रपानाचा वाईट परिणाम होतो आणि कुटुंबातल्‍या इतर सदस्यांवर देखील धूम्रपानाच्या धुराने त्रास होतो. तंबाखू किंवा धूम्रपानामुळे मधुमेह होण्‍याची शक्यता जास्त बळावते. तंबाखूपासून दूर राहिल्यास एक किशोर/किशोरीचा जीवनकाळ 20 वर्षाने वाढू शकेल. तंबाखूचा वापर करणारे किशोर/किशोरी अंततः यामुळे मृत्‍युमुखी पडतील. भारतात इतर देशांच्या मानाने तंबाखूमुळे मृत्यूमुखी पडणा-यांची संख्या दरवर्षी वाढत असल्‍याचा अंदाज आहे. धूम्रपान,  तंबाखूचे स्त्री व पुरुषांवर दुष्परिणाम होतात. याचे सेवन पुरुषांमध्ये नपुंसकतेचे कारण आहे धूम्रपान, तंबाखूचे सेवन स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी करते व रजोनिवृत्ती लवकर होते. धूम्रपान,  तंबाखूचे सेवन शारीरिक ताकद कमी करते आणि त्यामुळे सहनशीलता ढासळते. ज्या स्त्रिया धूम्रपान करतात आणि गर्भनिरोधके घेतात त्यांच्यात स्ट्रोकचा धोका वाढतो. ज्या गरोदर स्त्रियाधूम्रपान करतातत्यांच्यात गर्भपाताची शक्‍यता वाढतेकिंवा मूल कमी वजनाचे होतेकिंवा बाळाच्या विकासात्मक समस्या वाढतातकिंवा बाळाचा अचानक मृत्यु देखील ओढवू शकतो.तंबाखू सोडण्याचे शारीरिक तसेच सामाजिक फायदे आहेत. यामुळे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवन विरोधी मोहिमेत तरूणांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे आणि यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :