ईव्हीएम : सुरक्षित व विश्वासार्ह प्रणाली - डॉ. शरद जावळे, निवडणूक निर्णय अधिकारी, अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ

 ईव्हीएम : सुरक्षित व विश्वासार्ह प्रणाली


-        डॉ. शरद जावळे, निवडणूक निर्णय अधिकारी, अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ


प्रथमस्तरीय तपासणी


निवडणूक जाहीर होण्यापूर्वी ईव्हीएम मशीन ह्या प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी ईव्हीएम गोडाऊन आहे त्या ठिकाणी ठेवतात व त्याची जबाबदारी ही जिल्हाधिकारी यांची असते. त्या ठिकाणी सीसीटीव्ही व पोलीस सुरक्षा असते.नंतर बेल इंजिनिअर व कर्मचारी यांच्या मार्फत ईव्हीएम मशीनची प्रथम तपासणी केली जाते. त्यामध्ये नादुरुस्त ईव्हीएम बाजूला केले जाते व चांगले मशीन निवडणूकीसाठी तयार केले जाते, या वेळी राजकीय पक्ष यांच्या प्रतिनिधीसमक्ष व व्हिडिओग्राफी केली जाते, या वेळी पोलीस सुरक्षा असते.या प्रकियेला इव्हीएमची प्रथमस्तरीय तपासणी म्हणतात.


कडेकोट बंदोबस्त


निवडणूक जाहीर झाल्यावर ईव्हीएम जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीतील जिल्हा गोदामामधून त्या जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे देण्यासाठी इव्हीएम मशीनचे प्रथम रँडमायझेशन केले जाते म्हणजे सर्व मशीनची सरळमिसळ केली जाते. ही सर्व प्रक्रिया राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी  यांच्यासमोर भारत निवडणूक आयोग यांनी विकसित केलेल्या ईएमएस सिस्टिममध्ये 3 वेळा केली जाते, त्या नंतर सर्व मशीन पोलीस सुरक्षा व ज्या वाहनातून नेणार आहे त्या वाहनाला जीपीएस जोडलेले असते व तहसीलदार दर्जापेक्षा कमी नाही असा अधिकारी यांच्यावर वाहतूक करण्याची जबाबदारी असते. व त्या नंतर ईएमएस सॉफ्टवेअरमध्ये त्याची एन्ट्री केल्याशिवाय वाहतूक होत नाही.  इएमसएसला सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मोबाईलवर ओटीपी आल्याशिवाय ओपन होत नाही. त्यानंतर ईव्हीएम मशीन विधानसभा मतदार संघामधील इव्हीएम स्ट्रॉंग रूमला इएमएसला एन्ट्री करून स्ट्रॉंग रूममध्ये मशीन ठेवली जाते. या वेळी सुद्धा राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांना बोलावले जाते व सीसीटीव्ही व पोलीस सुरक्षा असते मशीन हे बंद व वेगवेगळ्या पेटीमध्ये असते.


दुसरे रँडमायझेशन


    त्यानंतर मतदानच्या 7 दिवस अगोदर निवडणूक निरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमक्ष व उमेदवार यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थित मध्ये ईव्हीएमचे दुसरे रँडमायझेशन करून ईव्हीएममशीन ची सरमिसळ करून मशिन त्या मतदारसंघामधील प्रत्येक मतदार केंद्राला दिली जाते व त्या नुसार बीयु, सीयु, व व्हीव्हीपॅट  जोडी करून घेतली जातात व या वेळी 20 टक्के बीयु व सीयु आणि व्हीव्हीपॅट 35 टक्के असे राखीव ठेवले जाते. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी  हे ईव्हीएम मशीन प्रत्येक मतदान केंद्र निहाय मशिन सील करून तयार केली जाते. या वेळी बीयु, सीयु, व्हीव्हीपॅटची जोडणी करून जेवढे उमेदवार असेल तेवढे उमदेवार सेट केले जाते जर 16 उमेदवार पेक्षा जास्त असेल तर 2 बीयु लागतात. बीयुवर उमेदवार यांची मत पत्रिका लावलेली असते.या वेळी नवीन बॅटरी सीयु व व्हीव्हीपॅटला लावली जाते.व व्हीव्हीपॅटला नवीन रोल टाकून उमेदवार यांचं चिन्ह लोड केले जाते. त्या मशीनला एसएलयु म्हणतात. ते बेलचे इंजिनिअर करतात, या वेळी मॉक पोल करून जेवढे उमेदवार आहे यांना प्रत्येकाला एक या प्रमाणे मतदार करून पहिले जाते, व सर्व मॉक पोल झाल्यावर स्लीप व्हीव्हीपॅटच्या ड्रॉप बॉक्स मधून काडून मोजतात व त्या नंतर त्या नष्ट करतात, या वेळी एकूण मतदान केंद्राच्या 5  टक्के  ईव्हीएम मशीन मॉकपोल साठी 1000 मतदान करण्यासाठी राजकीय पक्ष व उमेदवार यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष ड्रॉ काडून निवडले जातात व 1000 मतदान करून मॉकपोल केला जातो व त्या नंतर नवीन बॅटरी सीयुला व व्हीव्हीपॅटला बसवतात व त्या नंतर सर्व मशीन बंद करून सिलबंद करून स्ट्रॉंग रूम मध्ये उमेदवार यांच्या उपस्थित मध्ये स्ट्रॉंग रूम सिलबंद केली जाते. व स्ट्रॉंग रूम पोलीस अधिकारी यांच्या ताब्यात दिली जाते. त्या नंतर त्या ठिकाणी सीसीटीव्ही व लॉगबुक ठेवलेले असते, व  कोणती  नंबर ची मशीन कोणत्या केंद्रवर जाणार आहे यांची माहिती ems सॉफ्टवेअर वर व उमेदवार यांना दिली जाते. ज्या slu ने सिम्बॉल vvpat मध्ये लोड केले जाते ते उमेदवार यांचे प्रतिनिधी यांच्या समोर शिल बंद करून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कस्टडी मध्ये ठेवले जाते.


   त्या नंतर मतदान च्या अगोदर च्या दिवशी सदर स्ट्रॉंग रूम उमेदवार यांच्या उपस्थित मध्ये विडिओ ग्राफी मध्ये उघडले जाते. त्या नंतर सदर मशीन ही संबंधित मतदान पथक यांना दिली जाते. त्या नंतर मतदान पथक ईव्हीएम व इतर साहित्य पोलीस सुरक्षा मध्ये जीपीएस असलेल्या शासकीय वाहणात मतदान केंद्रवर जातात. मतदान सुरु होण्या अगोदर 90 मिनिट आधी मॉक poll करण्यासाठी सीयु. बीयु व व्हीव्हीपॅट ची जोडणी केली जाते या वेळी उमेदवार यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थित मध्ये केली जाते 15 मिनिट वाट पाहली जाते जर कोणी आले नाही तर 50 मतदान घेऊन मॉकपोल केला जातो त्या नंतर मशीन वर निकाल पाहून रेकॉर्ड ठेवले जाते व व्हीव्हीपॅटमधून 50  स्लीप मोजून त्याचा रेकॉर्ड ठेवले जाते.त्यानंतर सीयु. बीयु व व्हीव्हीपॅट  सील बंद करून जोडणी केली जाते व त्यानंतर मतदान सुरु केले जाते त्या नंतर संपूर्ण मतदान झाल्यावर सीयु. बीयु व व्हीव्हीपॅटची जोडणी अलग करून evm बंद करून सील बंद केले जाते सदर बंद असलेली व अलग केलेले ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मध्ये उमेदवार यांच्या उपस्थित मध्ये ठेवली जाते, या वेळी सीसीटीव्ही व विडिओग्राफी केली जाते. स्ट्रॉंग रूम ला तीन स्तर सुरक्षा पुरवली जाते, स्ट्रॉंग रूम ला लागून केंद्रीय राखीव पोलीस दल , या ठिकाणी कोणाला जाण्याची परवानगी नसते, त्या नंतर राज्य राखीव पोलीस दल व जिल्हा पोलीस बाहेर चा बाजूला असतात आत मध्ये 100 मी मध्ये कोणाला च जाण्यासाठी परवानगी नसते. व अधिकारी यांची नियमित भेट असते व त्याच रेकॉड ठेवले जाते, या ठिकाणी उमेदवार यांना सुद्धा राहण्यासाठी तंबू टाकला जातो व त्या ठिकाणी सीसीटीव्ही चे प्रेक्षपण दिले जाते. मतमोजणी च्या दिवशी स्ट्रॉंग रूम उमेदवार यांच्या उपस्थित उगडली जाते व मतदान केंद्र निहाय फेरी नुसार फक्त कंट्रोल युनिट मतमोजणी साठी आणले जाते व त्याचा स्विच ऑन करून मतमोजणी केली जाते. सर्व मतमोजणी झाल्यावर  5 मतदान केंद्राच्या व्हीव्हीपॅटच्या स्लीप मोजले जातात व त्याची पडताळणी केली जाते हे सुद्धा उमेदवार यांच्या समोर.


या संपूर्ण प्रकिया मध्ये सीयु. बीयु व व्हीव्हीपॅट  हे फक्त दोन वेळा एकत्र जोडले जातात एकदा मतदान केंद्र निहाय सील करताना व मतदान केंद्राववर दुसऱ्या वेळी मतदान करताना. दोनी वेळी उमेदवार किंवा त्याचं प्रतिनिधी उपस्थित  असतात. इतर वेळी सीयु. बीयु व व्हीव्हीपॅट वेगळे ठेवले असतात म्हणजे जोडणी केलेलं नसते व ते बंद केलेले असतात.त्या मुळे त्या मध्ये बदल करता येत नाही.


-        डॉ. शरद जावळे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :