अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना

 अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना

 

अकोला, दि. 27 : केंद्र शासनाच्या ‘स्टॅन्ड अप इंडिया’ उपक्रमांतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त मंगला मून यांनी केले आहे.

नवउद्योजकांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या उद्योजक लाभार्थ्यांना एकूण उद्योग प्रकल्पाच्या 25 टक्के स्वहिस्स्यातील जास्तीत जास्त 15 टक्के मार्जिन मनी शासनातर्फे उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेत राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांना 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के रक्कम शासनामार्फत देण्यात येते. योजनेचा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

            या योजनेसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता करुन प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.

 ०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ