आयटीआय (मुलींची )अकोला येथे उत्साह आणि जल्लोषात संपन्न झाला ' कौशल्य दीक्षांत ' समारंभ.

अकोला दि.शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( मुलींची) अकोला येथे कौशल्य दीक्षांत समारंभ अत्यंत उत्साह आणि जल्लोषात  संपन्न  झाला.

 औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची )अकोलाचे  प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कौशल्य दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य पदाचा प्रदीर्घ अनुभव असलेले जेष्ठ प्राचार्य शरद झोडपे हे  उपस्थित होते. तद्वतच अकोला जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी  (माध्यमिक) डॉ.सुचिता पाटेकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी विचारपीठावर , गटनिदेशिका रेखा रोडगे, मुख्य लिपिक जयंत गनोजे उपस्थित होते. तसेच विविध व्यवसायातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थान गुणवत्तेनुसार मिळवणाऱ्या प्रशिक्षणार्थींनीचे पालक  यावेळी विशेषत्वाने उपस्थित होते.
दीक्षांत समारंभाचे प्रास्ताविक करीत असताना संस्थेच्या गटनिदेशिका रेखा रोडगे यांनी संस्थेच्या एकूणच वाटचालीचा आढावा याप्रसंगी सादर केला.
दीक्षांत सोहळ्याला उपस्थित  सन्माननीय  अध्यक्ष आणि प्रमुख  अतिथी यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला   सावित्री आई फुले तद्वतच  भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन केले. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत बोकाडे यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे शिल्पनिदेशक अरविंद पोहरकर यांनी केले.
संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या विविध व्यवसायातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थान पटकाविणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी व यांचे  पालक आणि संबंधित शिल्पनिदेशक यांचे  उपस्थितीत स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
आपापल्या व्यवसायातून प्रथम आलेल्या युक्ता बोरकर ( आयसीटीएसएम ) , प्रणाली भगत (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक), प्रज्ञा पाटील ( आयसीटीएसएम ), रोशनी गंगाधरे (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक), श्रद्धा मूर्तिजापूरकर ( सेक्रेटीरियल प्रॅक्टिस) , माला चिकारिया ( इंटीरियर डिजाइन  डेकोरेशन अँड डेकोरेशन) , श्रद्धा तोमर ( कोपा) , रोहिणी इंगळे ( फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग), दुर्गा आल्हाट (फॅशन डिझाइनिंग) , अलका येलकर (ड्रेस मेकिंग ) , स्वाती सरकटे (कॉस्मेटोलॉजी), माधुरी वानकर ( बेकर्स अँड कंट्रक्शनर) यांना विशेषत्वाने तसेच द्वितीय आणि तृतीय आलेल्या प्रशिक्षणार्थींनी यांना कौशल्य दीक्षांत समारंभाच्या प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. एम्प्लॉयबिलिटी स्किल तसेच थिअरी या विषयात शंभर टक्के गुण प्राप्त करणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी यांना मान्यवरांच्या तसेच निदेशकांच्या हस्ते पदक देण्यात आले.
दीक्षांत समारंभाच्या प्रमुख अतिथी डॉ .सुचिता पाटेकर यांनी आपल्या जीवनपट यावेळेस उलगडून मांडला आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
यावेळी मुख्य अतिथी प्राचार्य शरद झोडपे  यांनी मार्गदर्शन करताना कोणतेही कौशल्य कमी अधिक नसून त्या कौशल्यातून आपली प्रगती साधल्या जाते आणि प्रगती करता आयटीआय मधील कौशल्य हे नेहमी सहकार्य करते तेव्हा थांबू नका पुढे चालत राहा. आयटीआय हा विपरीत परिस्थितीतून पुढे जाण्याचा मार्ग असल्याचे प्रामुख्याने प्रतिपादन केले.  
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता जयंत गणोजे, प्रशांत बोकाडे  , भालचंद्र दिगंबर , अरविंद पोहरकर , विनोद वेरूळकर , शुभांगी गोपणारायन, एन. पी. पन्हाळकर, , सौ. वृषाली सावरकर , लक्ष्मण जठाळ ,सौ. मनोरमा   भारसाकळे, सौ. वीणा लाड , निवेदिता माणीकराव ,  सोनल कुलकर्णी, सौ . किशोरी फुके,   ,  बी.एस. बोदडे,  मयुरी बासोडे , प्रवीण जुमळे, आशिष इधोळ , गजानन गावंडे ,पी. जी. डांगटे , भाग्यश्री इंगळे, नंदकिशोर मासोदकर व इतर सर्व कर्मचारी वृंद  यांनी परिश्रम घेतले.
पसायदान आणि नंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ