जि. प. आगरकर महाविद्यालयातून नवमतदार नोंदणीचा शुभारंभ

 

 

 

जि. प. आगरकर महाविद्यालयातून नवमतदार नोंदणीचा शुभारंभ

अकोला, दि. 15 : निवडणूकांच्या माध्यमातून व मतदानाच्या राष्ट्रीय कार्यातून लोकशाही बळकट होते. त्यामुळे नव्याने मतदानास पात्र झालेल्या सर्व तरूणांनी मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांनी आज येथे केले.

जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण, तसेच ‘स्वीप’ कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जि. प. आगरकर कनिष्ठ महाविद्यालयात नवमतदार नोंदणी शिबिर आज घेण्यात आले.  नायब तहसीलदार स्वप्नाली काळे, प्राचार्य सतीश देशमुख, समन्वय अधिकारी गजानन महल्ले, नोडल अधिकारी रवींद्र साकरकर आदी उपस्थित होते. शिबिरात महाविद्यालयाच्या 36 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली.

अर्हता दिनांकास वयाची 18 वर्षे पूर्ण करणारा एकही विद्यार्थी नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांनी प्रोत्साहित करावे, असे आवाहन श्री. परंडेकर यांनी यावेळी केले. 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा