शासन आपल्या दारी : मोहिम स्तरावर काम केल्याने प्रलंबित अर्जांचा निपटारा

 शासन आपल्या दारी

मोहिम स्तरावर काम केल्याने प्रलंबित अर्जांचा निपटारा

अकोला, दि. 8 : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात प्रशासनाने मोहिम स्तरावर काम केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित अर्जांचा निपटारा झाला. मोहिमेत महसूल विभागास प्राप्त अर्जांनुसार 6 हजार 549 व्यक्तींना आवश्यक विविध प्रमाणपत्रे वितरणासह विविध योजनांचा लाभ पात्र अर्जदारांना मिळवून देण्यात आला.   

महसूल विभागाकडून ‘शासन आपल्या दारी’ व ‘महसूल सप्ताह’ उपक्रम विविध तालुक्यांत राबविण्यात आला. त्यात विविध प्रमाणपत्र वाटपासह विविध योजनांसाठी प्राप्त अर्जांचा गतीने निपटारा करण्यात आला.  

महसूल विभागास प्राप्त अर्जांनुसार संजय गांधी योजना सर्वसाधारण यात 122, सं. गां. योजना अनु. जाती 23, श्रावणबाळ योजना सर्वसाधारण 177, श्रावणबाळ अनु. जाती 25, अनु. जमाती 5, इंदिरा गांधी योजना (वृद्धापकाळ) 6, इं. गां. योजना (विधवा भगिनींसाठी) 5, राष्ट्रीय कुटुंब अर्थसाह्य योजना 83, विविध प्रमाणपत्रे 6 हजार 549 आदी अर्जांना मंजुरी देण्यात आली. महिला व बालकल्याण, महिला व बालविकास, आरोग्य विभाग आदी सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आदी यंत्रणांच्या विविध योजनांचा लाभही अर्जदारांना देण्याबाबत गतीने कार्यवाही झाली. 

 आता ऑक्टोबर महिन्यात दिव्यांग बांधवांसाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’   शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या अडचणी जाणून घेऊन त्याच दिवशी निपटारा करण्यात येईल. दिव्यांग बांधवांना एकाच ठिकाणी विविध विभागांशी संबंधित दाखले, कागदपत्रे मिळण्यासाठी व शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी मदत होणार आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ