'स्वीप' कार्यक्रमात स्वयंसेवी संस्थांची सोमवारी बैठक

 'स्वीप' कार्यक्रमात स्वयंसेवी संस्थांची सोमवारी बैठक


अकोला, दि. १ : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण व स्वीप उपक्रमात नवमतदारांची नोंदणी व जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांची बैठक सोमवारी (४ सप्टेंबर) दु. ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील लोकशाही सभागृहात होईल.

अत्यल्प समुदाय, तृतीयपंथी, देहव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, दिव्यांग, भटक्या विमुक्त जाती जमाती यांचा या कार्यक्रमात सक्रिय सहभाग मिळवण्यासाठी व त्यांच्यात व्यापक जनजागृतीसाठी विशेष शिबिरे आयोजित करणे, कृती आराखडा तयार करणे याबाबत यावेळी चर्चा होईल. स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ