महाआरोग्य मेळाव्याच्या पूर्वतयारीला वेग

 

महाआरोग्य मेळाव्याच्या पूर्वतयारीला वेग

अकोला, दि. 28 : जिल्ह्यात नियोजित महाआरोग्य मेळाव्याच्या पूर्वतयारीला आरोग्य प्रशासनाकडून वेग देण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी आज विविध विभागप्रमुख, डॉक्टर, अधिकारी व कर्मचा-यांची बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय येथे दि. 7 व 8 ऑक्टोबर रोजी दोनदिवसीय महाआरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. 7 ऑक्टोबर रोजी मेळाव्याचा शुभारंभ होईल.

महाआरोग्य मेळाव्यात विविध प्रकारच्या आजारांबाबत तपासणी, निदान करण्यासाठी 15 हून अधिक कक्ष समाविष्ट असतील. आवश्यक तपासण्या व निदानानंतर संबंधितांना योग्य उपचारही मिळवून देण्यात येणार आहेत. महाआरोग्य मेळाव्याची माहिती विविध माध्यमांतून सर्वदूर पोहोचवावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय याबरोबरच इंडियन मेडिकल असोसिएशन व विविध आरोग्य संस्थांचे सहकार्य या मेळाव्याला लाभले आहे, असे डॉ. वारे यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना हाडोळे, डॉ. मो. असलम, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत पवार, डॉ. धनंजय चिमणकर, डॉ. नैताम, महापालिका अग्निमशन विभागप्रमुख श्री. मणियार,अंकुश गंगाखेडकर, संदीप घाटोळ आदी उपस्थित होते.  

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ