अद्ययावत शेती तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविणार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे तीन दिवसीय शिवार फेरी - कुलगुरू डॉ. शरद गडाख

 

अद्ययावत शेती तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविणार

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे तीन दिवसीय शिवार फेरी

-         कुलगुरू डॉ. शरद गडाख

अकोला, दि. 26 : अद्ययावत शेती तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागातर्फे दि. 29, 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर रोजी तीनदिवसीय शिवार फेरी व थेट पीक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दि. 29 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.कृषी मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती धनंजय मुंडे हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. विविध लोकप्रतिनिधी, विद्यापीठांचे कुलगुरू, कार्यकारी परिषद सदस्य आदी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

थेट पीक प्रात्यक्षिके हे शिवारफेरीचे वैशिष्ट्य असून एकूण 20 एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी प्रत्येकी एक गुंठा क्षेत्रावर विविध पीकांची एकूण २२५ थेट प्रात्यक्षिके पहावयास मिळणार आहेत. विविध संशोधन विभागांचे १ हजार १०० हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक क्षेत्र म्हणून पाहता येतील. त्याचप्रमाणे, १ हजार ५२९ हे क्षेत्रावर खरिप हंगामातील विविध पिकांचे बीजोत्पादन कार्यक्रम पहावयास मिळणार आहेत. शुभारंभानंतर रब्बी हंगामासाठी बियाणे विक्रीही करण्यात येईल.

विदर्भातील अकराही जिल्ह्यातील शेतकरी बांधव व विद्यार्थी प्रदर्शनाला भेट देणार आहेत. अधिकाधिक शेतकरी बांधवांनी शिवारफेरीत सहभाग घेण्याचे आवाहन कुलगुरू डॉ. गडाख यांनी केले. पत्रकार परिषदेला विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, जनसंपर्क अधिकारी किशोर बिडवे आदी उपस्थित होते.

 ०००

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ