भरडधान्याची उपयोगिता : क्षमता व भविष्यवेध; राष्ट्रीय चर्चासत्राचा शुभारंभ







 भरडधान्याची उपयोगिता : क्षमता व भविष्यवेध; राष्ट्रीय चर्चासत्राचा शुभारंभ

 भरडधान्य संवर्धन ही काळाची गरज

      ‘माफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील

अकोला, दि. 7 : मानवाच्या उत्तम आरोग्यासाठी भरडधान्याचा आहारात अवलंब महत्वाचा आहे. पशुखाद्यासाठीही भरडधान्ये अत्यंत उपयुक्त आहेत. उत्तम आरोग्यासाठी भरडधान्याचे संवर्धन व अवलंब ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी आज येथे केले.

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा पशूपोषण विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, तसेच इज्जतनगर (बरेली) येथील ॲनिमल न्यूट्रिशन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भरडधान्याची पशु आहारातील उपयोगिताः क्षमता व भविष्यवेध’ याविषयी राष्ट्रीय चर्चासत्र व कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

        पशुविज्ञान संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, पशुआहार संघटनेचे अध्यक्ष डॉ. एल. सी. चौधरी, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. एस. व्ही. उपाध्ये, भारतीय पशुवैद्यक परिषदेचे सदस्य डॉ. संदीप इंगळे, वरिष्ठ आहार तज्ज्ञ डॉ. विजय तिजारे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय चर्चासत्रात देशपातळीवरील अडीचशे तज्ज्ञ, अभ्यासक व  विद्यार्थी सहभागी झाले. शेतकरी, शास्त्रज्ञ व उद्योजक यांच्यातील संवाद हे सेमिनारच्या पहिल्या दिवसाचे आकर्षण ठरले. त्यात जवळजवळ 60 शेतकरी व पशुपालक यांनी भाग घेतला. पशुपोषणात चारानिर्मितीसाठी भरडधान्य लागवडीबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.  .

नागपूरच्या ‘व्हीएनआयटी’ या संस्थेच्या वतीने भरडधान्यांचा मानवी आहारासाठी उपयुक्त  पदार्थांचे प्रदर्शन व मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले. विविध पशुआहार व पशु औषधी निर्मिती कंपनी यांच्याही विविध दालनांचा प्रदर्शनात समावेश होता. 

विविध अभ्यासक व विद्यार्थ्यांकडून भरडधान्यावरील आपल्या संशोधनाचे सादरीकरणही यावेळी झाले. पशुवैद्यक, पशुपोषण अभ्यासक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चासत्राच्या स्मरणिकेचे व मिलेटस किट्सचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

पशुपोषण विभागप्रमुख डॉ. कुलदीप देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. श्वेता लेंडे सूत्रसंचालन केले. डॉ. अतुल ढोक यांनी आभार मानले.

००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ