छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियान अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचा उपक्रम जिल्ह्यातील युवकांना व्यवसायासाठी 16 कोटी 96 लक्ष रू. कर्जवाटप

 छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियान

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचा उपक्रम

जिल्ह्यातील युवकांना व्यवसायासाठी 16 कोटी 96 लक्ष रू. कर्जवाटप

  

अकोला, दि. 15 : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे मराठा समाजातील व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी इच्छूक युवकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातर्फे आतापर्यंत जिल्ह्यातील 261 लाभार्थ्यांना एकूण 16 कोटी 96 लाख 83 हजार 913 रू. कर्जवाटप करण्यात आले असून, त्यांना विविध व्यवसाय उभारण्यासाठी मदत झाली आहे.

                     महामंडळातर्फे छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यात युवक-युवतींना व्यवसायासाठी सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेअंतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास कर्जावरील व्याजाचा परतावा महामंडळाकडून केला जातो. त्यामुळे व्यवसाय उभारणीसाठी दिलासा मिळतो. मराठा समाजातील युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून मदत मिळते.

आतापर्यंत या योजनेत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून विविध युवकांनी घेतलेल्या कर्जावर 1 कोटी 63 लाख 82 हजार 690 रू. रकमेचा व्याज परतावा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, चालू वर्षात अकोला जिल्ह्यात 37 लाभार्थ्यांना 3 कोटी 18 लक्ष 20 हजार 829 रू. इतके कर्ज वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक रोहित पाटील यांनी दिली. 

                   अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे राबविण्यात आलेल्या या योजनेतून मराठा समाजातील नागरिकांना उद्योग व व्यवसाय करण्याची संधी प्राप्त झाली आहे.या कर्जाच्या माध्यमातून पोल्ट्री व्यवसाय, दुग्ध व्यवसाय,शेळीपालन, मेडिकल, कृषी सेवा केंद्र,हॉटेल, मालवाहतूक वाहने, ट्रॅक्टर, किराणा दुकान, फुटवेअर, टेलरिंग दूकान असे विविध प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत मिळते.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ