गोरेगावमधील एका जनावरात लंपी प्रादुर्भाव आढळला
अकोला, दि. 25 : मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव या गावातील एका बैलात लंपी त्वचारोगाचा प्रादुर्भाव आढळल्याने तेथील संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले आहे.
बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. संसर्ग केंद्राच्या ५ किमी परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण १०० टक्के पूर्ण यावे, असे आदेश पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा