श्री गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने दंडाधिका-यांच्या नियुक्त्या

 श्री गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने दंडाधिका-यांच्या नियुक्त्या

अकोला, दि. 26 :  शहरातील श्री गणपती विसर्जनाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संवेदनशील व महत्वाच्या ठिकाणी  कार्यकारी दंडाधिकारी व कर्मचा-यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार तसा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जारी केला.

सर्व संबंधित अधिकारी व कर्मचा-यांनी दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वा. नेमून दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे व शेवटची मिरवणूक संपेपर्यंत ठिकाण सोडू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. जयहिंद चौक, दगडी पूल, मामा बेकरी, माळीपुरा चौक, अकोट स्टँड चौक, तेलीपुरा चौक, कमेटी हॉल, ताजनापेठ, कोठडी बाजार, सिटी कोतवाली, गांधी चौक, जैन चौक आदी शहरातील विविध परिसरात प्रत्येकी पाच सदस्यांचा समावेश असलेली 6 पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

त्याचप्रमाणे, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री यांच्यासह विविध अधिका-यांवर संनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ