अमृत कलश यात्रेद्वारे घरोघर देशभक्तीचा जागर

 

मेरी माटी, मेरा देश

अमृत कलश यात्रेद्वारे घरोघर देशभक्तीचा जागर

- प्र. जिल्हाधिकारी वैष्णवी बी.

अकोला, दि. 5 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगतेनिमित्त 'मेरी माटी मेरा देश' उपक्रम देशभर राबविण्यात आला. त्याच्या पुढच्या टप्प्यात अमृत कलश यात्रा उपक्रमातून दि. 30 सप्टेंबरपर्यंत गावोगाव व घरोघर देशभक्तीचा जागर होईल. उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी बी. वैष्णवी यांनी येथे केले.

 

'माझी माती –माझा देश'मधील पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. यात वीरांची नावे असलेले शिलाफलक, वसुधा वंदनअंतर्गत वृक्षारोपण, पंचप्रण शपथही घेण्यात आली आहे. अमृत कलश यात्रा विविध टप्प्यात पार पडणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घर, प्रत्येक नागरिक, विद्यार्थी यांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

 

अमृत कलश यात्रेविषयी

 

पहिला टप्प्यात दि. १ ते ३० सप्टेंबरपर्यंत प्रत्येक घर, वॉर्ड आणि गावातून माती किंवा तांदूळ कलशांमध्ये गोळा करण्यात येईल. यावेळी पंचप्राण शपथही घेतली जाईल. वाजतगाजत ही माती गोळा करण्यात येणार आहे.

१ ते १३ ऑक्टोबरपर्यंत तालुका स्तरावर आणि पालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा यांच्या स्तरावर ही सर्व गोळा केलेली माती आणि तांदूळ एकत्र आणून मोठ्या कलशामध्ये एकत्र करण्यात येतील. यावेळी जिल्हा किंवा शहरातल्या सांस्कृतिक संस्था, एनसीसी, एनएसएस, स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून कार्यक्रम केले जातील. संबंधित परिसरातील देशासाठी लढलेले आणि उल्लेखनीय कामगिरी केलेले जवान, पोलीस, स्वातंत्र्य सैनिक किंवा हुतात्म्यांचे कुटुंबीय यांचा गौरव करण्यात येईल.

दि. २२ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत तालुका पातळीवरचे हे कलश मुंबईत एकत्र आणण्यात येतील. दि. २७ ऑक्टोंबरला मुंबईतून विशेष रेल्वेने हे कलश दिल्लीकडे रवाना करण्यात येतील. त्यावेळीही मोठा सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.

28 ते 30 ऑक्टोंबरपर्यंत देशाच्या राजधानीत विशेष रेल्वेद्वारे हे कलश वाजत गाजत पाठविण्यात येतील. १ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाजवळ देशाच्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या "अमृत वाटिके"त या कलशांमधील माती विसर्जित करण्यात येईल.

 

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ