‘आयटीआय’मध्ये रविवारी दीक्षांत समारंभ व 'पीएम स्कील रन' मॅराथॉन

 

‘आयटीआय’मध्ये रविवारी दीक्षांत समारंभ व 'पीएम स्कील रन' मॅराथॉन

अकोला, दि. 13 :  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची ) येथे दीक्षांत समारंभ व 'पीएम स्कील रन ' मॅराथॉन स्पर्धा रविवारी (दि. 17 सप्टेंबर) आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त स्वच्छता पंधरवड्याचाही शुभारंभही करण्यात येईल. 

दीक्षांत समारंभ सकाळी 10 वा. होणार असून संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थी मुलींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. प्रत्येक व्यवसाय शाखेतून पहिल्या तीन क्रमांकांत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.

यानिमित्त ‘पीएम स्कील रन ' या मॅराथॉन स्पर्धेची सुरूवात रविवारी सकाळी 7 वाजता संस्थेच्या आवारापासून करण्यात येईल. संस्थेच्या आजी, माजी प्रशिक्षणार्थी, तसेच वय 16 वर्षांवरील इतरही मुली व महिला स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.  मॅराथॉनमधील पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे तीन, दोन व एक हजार रू. रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेत अधिकाधिक मुलींनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांनी केले.

महात्मा गांधींच्या 154 व्या जयंतीनिमित्त व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत  ‘स्वच्छता व देखभाल पंधरवडा’  दि. 17 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यात संस्थेत विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे शिल्प निदेशक अरविंद पोहरकर यांनी सांगितले.

०००  

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ