अमृत कलश यात्रेला खेडोपाडी उत्स्फूर्त प्रतिसाद

 


 

 

अमृत कलश यात्रेला खेडोपाडी उत्स्फूर्त प्रतिसाद 

 

अकोला, दि. 18 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगतेनिमित्त 'मेरी माटी मेरा देश' उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रेला जिल्ह्यात विविध शहरांप्रमाणेच खेडोपाडीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आबालवृद्ध, महिलाभगिनी अत्यंत उत्साहात उपक्रमात सहभागी होत आहेत.

 

स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालये, पंचायत समित्यांबरोबरच  महिला बचत गट, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांद्वारे ठिकठिकाणी वाजतगाजत अमृत कलश यात्रा काढण्यात येत आहेत. अकोला शहरात महापालिकेतर्फे विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. लाखपुरी येथे ग्रामपंचायत व नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने घरोघरी जाऊन माती गोळा करण्यात आली. जिल्ह्यात प्रत्येक घर, वॉर्ड आणि गावातून माती किंवा तांदूळ कलशांमध्ये गोळा करण्यात येत आहे.  तालुका स्तरावर आणि पालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा यांच्या स्तरावर ही सर्व गोळा केलेली माती आणि तांदूळ एकत्र आणून मोठ्या कलशामध्ये एकत्र करण्यात येतील. त्यानंतर तालुका पातळीवरचे हे


 
कलश मुंबईत एकत्र आणण्यात येतील. विशेष रेल्वेने हे कलश दिल्लीकडे रवाना करण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाजवळ देशाच्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या "अमृत वाटिके"त या कलशांमधील माती विसर्जित करण्यात येणार आहे.  

0000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ