राष्ट्रीय लोकअदालतीत 5 हजार 286 प्रलंबित प्रकरणे निकाली

 

राष्ट्रीय लोकअदालतीत 5 हजार 286 प्रलंबित प्रकरणे निकाली

अकोला, दि. 11 : राष्ट्रीय, तसेच राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत 5 हजार 286 प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली, अशी माहिती जिल्हा सेवा विधी प्राधिकरणाचे सचिव योगेश सु. पैठणकर यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व दिवाणी, फौजदारी, कामगार, सहकार, कौटुंबिक, औद्योगिक न्यायालय व जिल्हा ग्राहक तक्रार आयोग येथे राष्ट्रीय लोकअदालत शनिवारी घेण्यात आली. सर्व न्यायालयांत प्रलंबित प्रकरणांपैकी 13 हजार 478 प्रकरणे लोकअदालतीत तडजोडीसाठी ठेवण्यात आली. त्यापैकी 2 हजार 133 प्रलंबित प्रकरणात व  3 हजार 153 दाखलपूर्व प्रकरणात समेट घडून आला. अशी एकूण 5 हजार 286 प्रकरणे निकाली निघाली.

लोकअदालतीत दिवाणी, फौजदारी, वैवाहिक वाद स्वरूपाची, तसेच मोटार वाहन अपघात प्रकरण व कलम 138 एनआय ॲक्ट आणि ग्रा. पं. घरपट्टी, पाणीपट्टी, तसेच महावितरण व बँकांची खटलापूर्व प्रकरणात सुमारे 34 कोटी 84 लक्ष 33 हजार 919 रू. ची तडजोड झाली.  

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. के. केवले यांचे मार्गदर्शन या उपक्रमासाठी लाभले. अधिक्षक डी. पी. बाळे, वरिष्ठ लिपीक संजय रामटेके, राजेश देशमुख, हरिश इंगळे यांनी परिश्रम घेतले. अकोला बार असोसिएशन, पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यांचे सहकार्य लाभले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ