‘मिशन इंद्रधनुष’मध्ये लस न घेतलेल्या बालकांचे लसीकरण पूर्ण करणार

       ‘मिशन इंद्रधनुष’मध्ये लस न घेतलेल्या

      बालकांचे लसीकरण पूर्ण करणार

अकोला, दि. 4 : मिशन इंद्रधनुष मोहिमेत लसीकरण न झालेल्या बालकांचे लसीकरण दि. 11 ते 16 सप्टेंबर दरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे नियमित लसीकरणापासून सुटलेल्या बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.

 मोहिमेत लसीकरणाचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी नुकतेच झालेल्या बैठकीत दिले होते. त्यानुसार नियमित लसीकरणापासून सुटलेल्या लाभार्थ्यांच्या लसीकरणाची विशेष मोहिम हाती घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. दीपक करंजीकर यांनी दिली.

   यापूर्वी दि. 7 ते 12 ऑगस्टदरम्यान राबवलेल्या मोहिमेत  दोन वर्षांखालील 2 हजार 365 आणि दोन ते पाच वर्षे या वयोगटातील  664 बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ