माजी सैनिक कुटुंबातील यशस्वी उद्योजक व गुणवंतांना पुरस्कार

 माजी सैनिक कुटुंबातील यशस्वी उद्योजक व गुणवंतांना पुरस्कार

अकोला, दि. 1 : माजी सैनिकांच्या कुटुंबातील दहावी, बारावीत 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे गुणवंत, तसेच खेळ, साहित्य, संगीत, नृत्य, उद्योग, व्यवसाय  आदी क्षेत्रांत यशस्वी कामगिरी केलेले माजी सैनिक किंवा दिवंगत सैनिकांच्या पत्नी किंवा पाल्यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आहे. तिथे पुरस्काराचे अर्ज उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर आहे.

                      0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन