अर्जांची पडताळणी पूर्ण; मुलाखतीसाठी यादी प्रसिद्ध ‘मनरेगा’ कामांच्या अंकेक्षणासाठी साधन व्यक्ती निवडणार

 अर्जांची पडताळणी पूर्ण; मुलाखतीसाठी यादी प्रसिद्ध  

‘मनरेगा’ कामांच्या अंकेक्षणासाठी साधन व्यक्ती निवडणार

अकोला, दि. 12 : ‘मनरेगा’मधील कामांच्या अंकेक्षणासाठी 100 साधन व्यक्तींची निवड करण्यात येणार असून, त्यासाठी प्राप्त अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. पडताळणीनंतर 303 व्यक्ती मुलाखतीसाठी पात्र ठरल्या असून, तशी यादी ‘एनआयसी’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत सर्व ग्रामपंचायतींत झालेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठी 100 साधन व्यक्तींचे पॅनेल तयार करण्यात येत आहे. त्यासाठी 603 अर्ज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. या अर्जांची पडताळणी पूर्ण करण्यात आली असून, 303 व्यक्ती मुलाखतीसाठी पात्र ठरल्या. पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जिल्हा सूचना केंद्राच्या (एनआयसी) संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ