राष्ट्रीय आपत्ती निवारण दलामार्फत विद्यार्थ्यांना देणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

 राष्ट्रीय आपत्ती निवारण दलामार्फत

विद्यार्थ्यांना देणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

अकोला, दि. 15 :  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) तज्ज्ञांमार्फत दि. 18 ते 30 सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

आपत्ती व्यवस्थापनाबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावे व सर्वदूर जनजागृती व्हावी, यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथक पुणे येथून येणार आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील शाळा व महाविद्यालयांमध्ये हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी दिली.

कार्यक्रमानुसार अकोला येथे आरएलटी महाविद्यालयात दि. 18 सप्टेंबरला, श्री शिवाजी महाविद्यालयात 20 सप्टेंबरला, पातूर येथे डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालयात दि. 21 सप्टेंबरला, तर व्याळा येथे श्रीमती यशोदाबाई इंगळे विद्यालयात 22 सप्टेंबरला,  मूर्तिजापूर येथील गाडगे महाराज महाविद्यालयात दि. 25 सप्टेंबरला सकाळी 11 ते 3 या वेळेत प्रशिक्षण होईल. अकोट येथील श्री शिवाजी महाविद्यालयात 23 सप्टेंबरला, तर तेल्हारा येथील गोपाळराव खेडकर महाविद्यालयात दु. 12 ते 4 या वेळेत प्रशिक्षण होईल.

बार्शिटाकळी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात दि. 27 सप्टेंबरला व अकोला येथील डाबकी रस्त्यावरील खंडेलवाल महाविद्यालयात दि. 30 सप्टेंबरला सकाळी 11 ते 3 या वेळेत प्रशिक्षण होईल. एनएसएस, एनसीसीचे विद्यार्थी प्रशिक्षणात सहभागी होतील.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ