वेगवेगळ्या ठिकाणी चार जनावरांत ‘लंपी’चा प्रादुर्भाव आढळला

 

वेगवेगळ्या ठिकाणी चार जनावरांत ‘लंपी’चा प्रादुर्भाव आढळला

प्रतिबंधित क्षेत्र घोषित

अकोला, दि. 5 : जिल्ह्यात वेगवेगळ्या चार ठिकाणी प्रत्येकी एका जनावरांत लंपी त्वचारोगाची लागण झाल्याचे आढळले असून, या सर्व ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

याबाबत पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाल्यानुसार प्रतिबंधात्मक आदेश प्र. जिल्हा दंडाधिकारी वैष्णवी बी. यांनी आज जारी केला. पातूर तालुक्यातील आलेगावातील एका गाईमध्ये, आसोला गावातील एका बैलामध्ये, बार्शिटाकळी तालुक्यातील येवता या गावातील नर वासरामध्ये व मूर्तिजापूर तालुक्यातील मंदुरा गावातील एका बैलामध्ये लंपी त्वचारोगाची लागण आढळून आली. या चारही गावांतील संसर्ग केंद्रापासून 10 किमी क्षेत्र बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे, पाच किमी परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण   करण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जि. प. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, तसेच जिल्हा पशूवैद्यकीय सर्वचिकित्सालय यांनी नियोजन करून लसीकरण 100 टक्के पूर्ण करण्याचे आदेश आहेत.

००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ