नुकसानग्रस्तांना २५ टक्के अग्रीम देण्याबाबत अधिसूचना जारी

 

 

 

 नुकसानग्रस्तांना २५ टक्के अग्रीम देण्याबाबत अधिसूचना जारी

 

अकोला, दि. 9 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सोयाबीन या अधिसूचित पीकासाठी 52 महसूल मंडळांतील नुकसानग्रस्त विमाधारक शेतकरी बांधवांच्या खात्यात 25 टक्के अग्रीम एका महिन्याच्या आत जमा करावा, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी बी. वैष्णवी यांनी जारी केली आहे. 

जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार ही अधिसूचना जारी करण्यात आली असून, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स विमा कंपनीने एका महिन्याच्या आत कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 अकोट तालुक्यातील अकोट, मुंडगाव, पणज, चोहोट्टा बाजार, कुटासा, आसेगाव बाजार, उमरा, अकोलखेड, तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा, माळेगाव बाजार, हिवरखेड, अडगाव बु., पाथर्डी, पंचगव्हाण, बाळापूर तालुक्यातील बाळापूर, पारस, व्याळा, वाडेगाव, उरळ, निंबा, हातरूण, पातूर तालुक्यातील पातूर, बाभूळगाव, आलेगाव, चान्नी, सस्ती, अकोला तालुक्यातील अकोला, घुसर, दहिहंडा, कापशी, उगवा, आगर, बोरगाव, शिवणी, पळसो, सांगळूद, कुरणखेड, कौलखेड, तसेच बार्शिटाकळी तालुक्यातील बार्शिटाकळी, महान, राजंदा, धाबा, पिंजर, खेर्डा आणि मूर्तिजापूर तालुक्यातील मूर्तिजापूर, हातगाव, निंभा, माना, शेलू बाजार, लाखपुरी, कुरूम, जामठी बु. या 52 महसूल मंडळांत ही अधिसूचना लागू होईल.

ज्या महसूल मंडळांत चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनात गत 7 वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर विमा नुकसान भरपाईच्या 25 टक्के मर्यादेपर्यंत शेतक-यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. त्यानुसार ही अधिसूचना काढण्यात आली.  

 

०००

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ