पं. उपाध्याय रोजगार मेळाव्यात 137 उमेदवारांची प्राथमिक निवड

 

शासन आपल्या दारी

पं. उपाध्याय रोजगार मेळाव्यात

 137 उमेदवारांची प्राथमिक निवड

 

           अकोला, दि. 13 : जिल्‍हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकमा मार्गदर्शन केंद्र, अकोला कार्यालयातर्फे आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्यात विविध पदांसाठी 137 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. संपन्‍न झाला.

          भारतीय जीवन विमा निगम, धूत इलेक्ट्रिकल्स, फिनोलेक्स, इण्डुरन्स टेक्नॉलॉजी,  रेणूक्रॉफ्ट, उत्‍कर्ष मायक्रो फायनान्‍स, ॲबेलो इलेक्ट्रो., लिबेन लाईफ आदी कंपन्यांतील  256  रिक्‍त पदांसाठी मेळावा घेण्यात आला. मेळाव्‍यात एकूण 279 उमेदवारांनी सहभाग नोंदविला. त्‍यापैकी एकूण 137 उमेदवारांची   त्‍यांनी सादर केलेल्‍या शैक्षणिक कागदपत्रांच्‍या आधारे  प्राथमिक निवड करण्‍यात आली.

                    निवड झालेल्‍या उमेदवारांना कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी ग.प्र.बिटोडे यांच्या हस्‍ते प्राथमिक निवडपत्र प्रदान करण्‍यात आले.   जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, जिल्हा समन्वयक गजानन महल्ले आदी उपस्थित होते.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ