सुधारीत :- गणेशोत्सवाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक विसर्जन मार्गावर आवश्यक सुविधा उभारा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. २१ :   गणेशविसर्जन मिरवणूका शांततेत पार पडण्यासाठी पुरेसा बंदोबस्त व भाविकांना आवश्यक सुविधा उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.

गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने  बैठक नियोजनभवनात जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस अधिक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक  अभय खंडारे, सार्वजनिक गणेशोत्सव अध्यक्ष मोतिसिंह मोहता, महासचिव सिध्दार्थ शर्मा, महानगरपालीका  उपायुक्त प्रशासन गीता वंजारी शहर अभियंता नीला वंजारी विविध गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, महावितरण तसेच आरोग्य विभाग यांच्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. विसर्जन मार्गावर पुरेसा बंदोबस्त असावा. रस्त्यावर खड्डे असल्यास तत्काळ दुरूस्ती करावी. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. मार्गावर नागरिकांना आवश्यक पेयजल, स्वच्छतागृहे आदी सुविधा ठेवाव्यात. रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक पुरेश्या औषधसाठ्यासह उपलब्ध ठेवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी दिले.

या काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी
'महावितरण'ने घ्यावी. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा बंदोबस्त ठेवावा, असेही निर्देश देण्यात आले. विविध मंडळांच्या प्रतिनिधींशी यावेळी चर्चा करण्यात आली.
000000







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ