सुधारीत :- जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ अभियान प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अजित कुंभार





 

 

 

अकोला, दि. 12 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘चला जाणूया नदीला’ या अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी ही मोहिम अत्यंत महत्वपूर्ण असून, सर्व विभागांनी समन्वयाने व प्रभावीपणे अभियान राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.   

 

अभियानाच्या अनुषंगाने नियोजन व कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला नरेंद्र चुग, रमाकांत कुलकर्णी, जयाजी पाईकराव  हे राज्य समितीचे अशासकीय सदस्य, तसेच समन्वयक अरविंद नळकांडे, सुधीर सरकटे, तसेच वन विभाग, नियोजन विभाग आदी विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

 

 जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, जिल्ह्यातील पिंजर्डा, चंद्रभागा या नद्यांचा समावेश अभियानात करण्यात आला आहे. अभियानाच्या अनुषंगाने आवश्यक कामांच्या मान्यता व यापुढील नियोजन आदी कार्यवाहीची पूर्तता करून घ्यावी. नद्यांतील प्रदूषण, अतिक्रमण, उपसा आदी रोखून पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने हे काम अत्यंत महत्वपूर्ण असल्याने त्यादृष्टीने कार्यवाहीला वेग द्यावा.

 

यावेळी राज्य समितीच्या विविध सदस्यांनी अधिका-यांसमवेत अभियानाच्या अनुषंगाने चर्चा केली. अभियानात नदी संवाद यात्रा, नदीसाक्षरता वाढविणे, नदीचा तट, प्रवाह, जैवविविधतेबाबत जागृती, नदीखो-यांचे नकाशे, पूररेषा, पाणलोट क्षेत्राचे नकाशे, मातीचे क्षरण, पूर व दुष्काळ, तसेच अतिक्रमण, शोषण व प्रदूषण या तीन प्रमुख कारणांचा अभ्यास व त्याचा परिणाम तपासणे आदी कामे अपेक्षित आहेत. त्यादृष्टीने यंत्रणांनी या कामांना वेग देण्याची सूचना विविध सदस्यांनी केली.  

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ