राष्ट्रीय पोषण अभियानात विविध उपक्रम

 


राष्ट्रीय पोषण अभियानात विविध उपक्रम

       अकोला, दि. 4 :  सुपोषित भारत, कुपोषणमुक्त भारत या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेवर आधारित पोषण अभियानात सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा होत आहे.  अंगणवाडी केंद्रे व प्रकल्प स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी राजश्री कोलखेडे यांनी दिली.

पोषण अभियानाच्या अंमलबजावणीसाठी समाजाचा पोषण अभियान कार्यक्रमात सक्रिय सहभाग असणे आहे, जेणेकरुन अंगणवाडी सेवा लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविता येतील. त्यादृष्टीने १ हजार ३१५ अंगणवाडी केंद्रे व ७ प्रकल्प स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

अभियानाचा शुभारंभ नुकताच सहकारनगरमधील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी अंगणवाडी सेविकांनी तयार केलेल्या रानभाज्या, विविध पदार्थ, त्याचप्रमाणे, जनजागृतीचा फलकांचा समावेश असलेले प्रदर्शनही घेण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञ किर्ती देशमुख यांनी यावेळी आहाराबाबत मार्गदर्शन केले.  

 अभियानात बाळाच्या जन्मानंतर पहिल्या सहा महिन्यापर्यंत केवळ स्तनपान, त्यानंतर पूरक पोषक आहार, स्वस्थ बालक स्पर्धा, पोषणाबरोबर शिक्षण, पोषणविषयक सुधारणा, मेरी माटी मेरा देश, आदिवासी भागात पोषणविषयक संवेदनशीलता वाढविणे, ॲनिमिया तपासणी, उपाय व जनजागृती आदी कार्यक्रम राबविण्यात आले.

            ०००


--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम