रोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘इंडस्ट्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 17 सप्टेंबरला नागपूर येथे आयोजन

 

रोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘इंडस्ट्री 

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 17 सप्टेंबरला नागपूर येथे आयोजन

           अकोला, दि. 13 : बेरोजगार युवकांना रोजगारांच्या संधी व उद्योगांना आवश्यक असलेले कुशल, अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन आणि उद्योगसमुह, प्लेसमेंट एजन्सीज यांच्यात सामंजस्य करार रविवार, 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता ‘इंडस्ट्री  मीट’च्या माध्यमातून होणार आहे.

             राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरातील गुरुनानक भवन येथे ‘इंडस्ट्री मीट’ होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होईल. यावेळी कौशल्य विकास रोजगार  व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित राहतील.

           कौशल्य केंद्र आपल्या दारी या संकल्पनेतून अकोला जिल्ह्यातील  विविध नामांकित उद्योग, उद्योजक संघटना व प्लेसमेंट एजन्सीज  यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अप्पर मुख्य सचिव, कौशल्य विकास आयुक्त आदी यावेळी उपस्थित असतील.

जिल्ह्यातील नामांकित उद्योग, विविध उद्योग संघटना व प्लेसमेंट एजन्सीज यांच्यामध्ये करार करण्याचे काम सुरु असून, आजपर्यत 25 पेक्षा जास्त उद्योजकांसोबत  सामंजस्य करार करण्यात आले आहेत.  राज्यातील विविध विभागांमध्ये ‘इंडस्ट्री मीट’चे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटना, उद्योजक, मोठे हॉटेल्स, मॉल्स, प्लेसमेंट एजन्सीज सिक्युरिटी एजन्सीज यांना आवश्यक ते कुशल मनुष्यबळ विनामूल्य उपलब्ध करणे, उद्योगाची मोफत जाहिरात करणे, उद्योगांना रोजगार प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळवून देणे, उमेदवारांना रोजगार मिळण्यासाठी शासन आणि उद्योग समूह यांच्यात सामंजस्य व समन्वय साधने यासाठी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून माहिती उपलब्ध करुन देण्याचा या उपक्रमामागचा उद्देश आहे.

अकोला जिल्हयातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला कार्यालयामार्फत सामंजस्य करार  करण्यात आलेल्या 25 उद्योजकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरातील गुरुनानक भवन येथे १७ सप्टेंबरला आयोजित इंडस्ट्री मीट उपक्रमामध्ये  उपस्‍थित राहण्याचे आवाहन  सहायक आयुक्त द.ल.ठाकरे यांनी केले आहे. 

 000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ