विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मिळणार मूर्त रूप

 

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज

 विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मिळणार मूर्त रूप


अकोला, दि. 5 : विद्यार्थ्याच्या अभिनव संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी 'महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज' स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास सहायक आयुक्तांनी केले आहे.

 

विद्यार्थ्यांच्या संकल्पना व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत ही स्पर्धा घेण्यात येत आहे. त्यात सर्व महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत सहभागी होता येईल. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी याबाबत नुकतेच सर्व प्राचार्यांची ऑनलाईन बैठक घेऊन सर्व महाविद्यालयांनी सहभाग आवाहनही केले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे त्यांचे नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ते पाठबळ पुरवणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

 
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा 0724-2433849 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ