लोकअदालतीतून मिटला भावंडांतील वाद

 

लोकअदालतीतून मिटला भावंडांतील वाद

अकोला, दि. 13 : येथील एक कुटुंबात वडलोपार्जित संपत्तीवरून निर्माण झालेला वाद जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित लोकन्यायालयाच्या माध्यमातून मिटला.

      प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. केवले यांच्या मार्गदर्शनानुसार विधी सेवा प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन नुकतेच करण्यात आले. त्यात येथील फडकेनगरातील एका कुटुंबातून अर्ज प्राप्त झाला. वडलोपार्जित संपत्तीवरून दोन भावांमधील वादाबाबतचे ते प्रकरण होते. याबाबत संबंधितांशी चर्चा करून हे प्रकरण लोकन्यायालयात ठेवण्यात आले. न्यायाधीश संजय मुळीक यांच्या पॅनलसमोर सुनावणी झाली. दोन्ही पक्षकारांचा वाद सामोपचाराने मिटविण्यात आला. अर्जदारांनी समाधान व्यक्त केले. लोकन्यायालयामुळे भावंडांतील वाद संपुष्टात आला, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी दिली.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ