टपाल सेवा तक्रार निवारणासाठी 18 सप्टेंबरला डाक अदालत

 टपाल सेवा तक्रार निवारणासाठी  18 सप्टेंबरला डाक अदालत

अकोला, दि. 6 : टपाल सेवेबाबतच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी डाक अदालत दि. 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता  प्रवर अधिक्षक टपाल कार्यालयात होईल.

                       स्पीड पोस्ट, टपाल, पार्सल, मनीऑर्डर, बचत बँक आदी टपाल सेवांबाबत तक्रारींचे सहा आठवड्यांत निराकरण होणे आवश्यक असते. तथापि, या काळात निराकरण न झाल्यास डाक अदालतीत दाद मागता येते. त्यामुळे अशी तक्रार असल्यास दि. 12 सप्टेंबरपूर्वी तक्रार अर्ज पाठवावा. अर्जासोबत मूळ तक्रार अर्ज, तक्रार दाखल केल्याची तारीख व अधिका-याचे नाव नमूद करावे, असे आवाहन प्रवर अधिक्षकांनी केले आहे.

०००         

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम