मागासवर्ग प्रवर्गाच्या रिक्त जागांबाबत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

 ग्रा. पं. पोटनिवडणूक

मागासवर्ग प्रवर्गाच्या रिक्त जागांबाबत 
आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

अकोला, दि. १ : ग्रा. पं. पोटनिवडणुकीसाठी मागासवर्ग प्रवर्गाच्या रिक्त जागांबाबत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

तसा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जारी केला.
निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य किंवा थेट सरपंच पदाच्या रिक्त  जागांच्या पोटनिवडणुका लवकरच होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिकेनुसार दि. 25 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झालेल्या ग्रामपंचायतीतील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या रिक्त जागा भरण्यापूर्वी समर्पित आयोगाच्या अहवालातील शिफारशीनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या जागा अनारक्षित करून सर्वसाधारण म्हणून अधिसूचित करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार ही आरक्षण सोडत होणार आहे.

कार्यक्रमानुसार, सोडतीसाठी विशेष ग्रामसभेची सूचना दि. ४ सप्टेंबरला जाहीर होईल. दिनांक 8 सप्टेंबरला विशेष ग्रामसभेद्वारे सर्वसाधारण जागा निश्चित करण्यात येतील. अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेत सुधारणा करून योग्य सूचना दिनांक 12 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे 56 सदस्य व 3 थेट सरपंच अशा एकूण 59 पदांची पोटनिवडणूक होणार आहे. 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ