दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी पोलीस लॉन येथे दि. 3 ऑक्टोबरला जिल्हास्तरीय कार्यक्रम

 दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी

पोलीस लॉन येथे दि. 3 ऑक्टोबरला जिल्हास्तरीय कार्यक्रम

अकोला, दि. 26 : विविध प्रवर्गातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दु. 4 वा. दरम्यान पोलीस लॉन येथे आयोजित करण्यात आला आहे.

शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन त्याच ठिकाणी निपटारा करण्यात येणार आहे. अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.    

कार्यक्रमात विविध विभागांचे कक्ष उपलब्ध राहतील. कार्यक्रमाच्या दिवशी प्रातिनिधिक स्वरुपात दिव्यांग लाभार्थ्यांना लाभाचे वितरण केले जाईल. आवश्यक दाखले, कागदपत्रे विविध कक्षांद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील.   लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच कक्षांच्या माध्यमातून अनेक योजनांची माहितीही देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी आवश्यक मनुष्यबळ, वाहन व्यवस्था, कक्ष उभारणी, आवश्यक साहित्याची तजवीज करावी. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना या उपक्रमाचा लाभ मिळण्यासाठी सर्वदूर प्रसिद्धी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी यंत्रणांना दिले आहेत.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ