ग्रामपंचायत पोटनिवडणुक: प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध;हरकती घेण्यास दि.२ मार्च पर्यंत मुदत

 अकोला,दि.२४(जिमाका)- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणामुळे ग्रामपंचायतीतील सदस्य किंवा थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदार याद्यांच्या कार्यक्रम राबवावयाचा आहे. त्यासाठी मतदार यादी कार्यक्रम आयोगाने घोषित केला असून आज प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी  प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रापं/जिप/पंस. निवडणूक विभाग सदाशिव शेलार यांनी कळविले आहे.

या याद्यांबाबत हरकत घ्यावयाची असल्यास त्यासाठी दि.२४ फेब्रुवारी ते दि.२ मार्च या कालावधीत संबंधित तहसिल कार्यालयात स्विकारण्यात येतील. त्यानंतर प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी दि.९ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध होईल,असेही कळविण्यात आले आहे.

अकोला जिल्ह्यात ५८ ग्रामपंचायतींमधील ७२  सदस्य पदाच्या रिक्त जागांसाठी तर थेट सरपंचपदाच्या पाच पदांसाठी निवडणुका होणार आहेत. त्यात तेल्हारा तालुक्यात ५ ग्रापंचे ५ सदस्य, अकोट तालुक्यात ६ ग्रापं चे १० सदस्य (एक सरपंचपद),  मुर्तिजापूर तालुक्यात १३ ग्रापं चे १६ सदस्य, अकोला तालुक्यात ११ ग्रापंचे १५ सदस्य (एक सरपंच पद), बाळापूर तालुक्यात १२ ग्रापं चे १७ सदस्य (एक सरपंचपद),  बार्शीटाकळी तालुक्यात ५ ग्रापंचे ४ सदस्य (एक सरपंच पद), पातूर तालुक्यात ६ ग्रापंचे ५ सदस्य (एक सरपंचपद) याप्रमाणे समावेश आहे, अशी माहिती  उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रापं/जिप/पंस. निवडणूक विभाग सदाशिव शेलार यांनी दिली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ