स्टॅण्डअप इंडिया योजनेतील पात्र अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना ‘मार्जिन मनी’ साठी अर्ज करण्याचे आवाहन

 अकोला,दि.10 (जिमाका)- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकातील नवउद्योजकांना मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. तथापि, सवलतीस पात्र नवउद्योजक लाभार्थ्यांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नाही अशा उद्योजकांना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थ्यांच्या हिश्श्यातील 25 टक्के मधील 15 टक्के मार्जिन मनी शासनामार्फत देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी  पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

            केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील लाभार्थ्यांसाठी मार्जिन मनी योजना 8 मार्च 2019 च्या शासन निर्णयानुसार सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के सबसिडी राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. यात 10 टक्के रक्कम लाभार्थ्यांचा स्वहिस्सा असेल.  योजनेकरीता इच्छुक लाभार्थ्यांनी बँकेच्या शिफारस व आवश्यक कागदपत्रासह समाजकल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ