शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबीर


अकोला,दि. 17(जिमाका)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढी विभागामार्फत रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे रविवार दि. 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अंतर्गत वैद्यकीय, दंत, आयुष, सुश्रुष इ. महाविद्यालयामार्फत वर्षभर अभियानातंर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये रक्तदान शिबीर, रक्तदानसंबंधित वक्तृत स्पर्धा, रक्तदान जनजागृती प्रभातफेरी, रांगोळी अशा विविध स्पर्धेचे आयोजन होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे रक्तदान शिबीर होणार आहे. या रक्तदान अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ