सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय शाळा,वसतीगृहांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

             अकोला,दि.२०(जिमाका)- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,अकोला  तसेच इतर स्थानिक वसतिगृह येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.  यात  जिल्ह्यातील इतर निवासी शाळांमध्ये तसेच वसतिगृहातील कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रा विषयी मार्गदर्शन, देखावे सादर करणे, गीतगायन, नाटीका सादरीकरण राबविण्यात आले. सौरभ तायडे व श्रीमती. सोनुताई उपर्वट,सरपंच,शेळद  यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमांमध्ये सहाय्यक आयुक्त, कार्यालयातील सर्व कर्मचारी ,सर्व वसतिगृहातील गृहपाल विद्यार्थी तसेच कार्यालयीन कर्मचारी तसेच   निवासी शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग, विद्यार्थी तसेच कार्यालयीन इतर कर्मचारी उपस्थित होते, असे सहा.आयुक्त श्रीमती डॉ.अनिता राठोड यांनी कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ