कोवीडः आरटीपीसीआर चाचण्यात ‘एक’ पॉझिटीव्ह

 अकोला दि.२४ (जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ६७ अहवाल प्राप्त झाले. त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. दरम्यान दि.२३ रोजीही एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. १ व खाजगी ०)१+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ०=एकूण पॉझिटीव्ह १.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतील कोरोना संसर्ग तपासणी अहवालात दि. १४ ते २२ फेब्रुवारी कालावधीत कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नव्हता. तथापि गुरुवार दि.२३ रोजी व आज(दि.२४) आरटीपीसीआर चाचण्यात एकाचा  असे एकूण दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दि.२३ रोजी एका महिला व दि.२४ रोजी एका पुरुष रुग्णाचा समावेश असून हे रुग्ण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘दोन’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६६०८२(४९९४९+१५१४२+९९१)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दोन सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ