पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; बुधवारी(दि.8) होणार 243 पदांसाठी भरती प्रक्रिया

 


अकोला,दि.6(जिमाका)- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  बुधवार दि. 8 फेब्रुवारी रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्यात 243 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. तरी इच्छुक पात्रताधारकांनी  या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन बुधवार दि.8 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळात करण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा मेळावा होणार आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी आपल्या बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो सह स्वखर्चाने उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0724-2433849 व भ्रमणध्वनी क्रमांक 9665775778 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन