आधारभूत धान्य खरेदी योजना: तूर पिकाची ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

 अकोला,दि.२२(जिमाका)- शासनाच्या आधारभूत धान्य खरेदी योजनेअंतर्गत  हंगाम २०२२-२३ मध्ये  तूर खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ७/१२ नोंदीनुसार तूर पिकाची ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी पी.एस. शिंगणे यांनी केले आहे.

अकोला जिल्ह्यात बाळापूर, पातुर, पारस, तेल्हारा, बार्शी टाकळी, उगवा व थार एमआयडीसी तसेच वाशिम जिल्ह्यात मालेगाव याठिकाणी मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने तूर पिकाची ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. त्यासाठी दि. ६ मार्च २०२३ पर्यंत मुदत दिली आहे. तसेच खरेदीसाठी ३० एप्रिल २०२३ पर्यंत मुदत आहे.  तरी सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांनी ७/१२ वरील पीक पेऱ्यानुसार ऑनलाईन नोंदणी करुन हमी दराचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ