जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समिती सदस्य निवडीकरीता प्रस्ताव मागविले


अकोला,दि. 8(जिमाका)- कामाच्या ठिकाणी माहिलांचे लैंगीक छळापासून संरक्षण अधिनियमानुसार जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार निवारण समिती सदस्य निवडीकरीता प्रस्ताव मागविले आहे. या समितीमध्ये एक अध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. पात्र इच्छुक व्यक्तींनी दोन प्रतीत प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले आहे.

            सदस्यांकरिता अटीशर्ती याप्रमाणे :

अध्यक्ष पदाकरीता सामाजिक कार्य, महिला सशक्तीकरण, विशिष्ट ठिकाणी महिलांच्या छळाबाबत पाच वर्षाचा काम केल्याचा अनुभव आवश्यक. महिलांच्या सोयीसाठी बांधील व समस्यांबाबत परिचित असलेली महिला असावी. तसेच श्रम रोजगार सेवा तथा दिवाणी फौजदारी कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक राहिल.

सदस्य पदाकरीता अशासकीय संघटना, संघ, महिला समस्यांसंबधित प्रश्नांशी परिचित व कायद्याचे ज्ञान असलेली व्यक्ती पात्र राहिल.  एससी, एसटी, ओबीसी किंवा अल्पसंख्याक समाजातील महिला असावी. तसेच कायद्याचे ज्ञान असल्यास प्राधान्य राहिल. महिलांकरिता पाच वर्ष सामाजिक कार्याचा अनुभव असावा. याबाबत पेपर कात्रणे व कामकाजाची कागदपत्रे प्रस्तावासोबत जोडावी.

            अध्यक्ष किंवा सदस्य पदाकरीता पात्र असणाऱ्या व्यक्तीवर कुठलाही गुन्हा नोंद नसल्याचे पोलीस अधिक्षक कार्यालयाचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र व जिल्हादंडाधिकारी यांचे विना दुराचार प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहिल. पात्र इच्छुक व्यक्तींनी परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, अकोला यांचेकडे 30 दिवसांच्या आत  सादर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.   

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ