जवाहर नवोदय विद्यालय; नववी प्रवेशाकरीता शनिवार(दि.11)निवड चाचणी परीक्षा:प्रवेशपत्र उपलब्ध



अकोला,दि. 2(जिमाका)- केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डव्दारे जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववी प्रवेशासाठी शनिवार दि. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता निवड चाचणी परिक्षा होणार आहे. या परिक्षेकरिता जिल्ह्यातील 334 विद्यार्थी सहभागी होणार असून परिक्षेचे प्रवेशपत्र https://nvsadmissionclassnine.in/nvs9reg/homepage  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.

परिक्षेकरीता सूचना : विद्यार्थ्यांनी परिक्षेकरीता सकाळी साडेदहा वाजता केंद्रावर हजर राहावे. उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्या जाईल. परीक्षार्थ्यांनी सोबत प्रवेशपत्र व आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक राहिल. परिक्षेकरिता काळा व निळा बॉलपेनाचा वापर करावा, भ्रमणध्वनी, कॅलक्युलेटर व इतर इलेक्ट्रानिक्स सामग्री परीक्षा हॉलमध्ये वापरण्यास मनाई राहिल. परिक्षा केंद्रावर कोविड नियमाचे पालन करावे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ