जिल्हा कोषागारात कार्यालयप्रमुख व लेखा लिपिकांना ई-कुबेर प्रणाली प्रशिक्षण

 


अकोला,दि.२१(जिमाका)- येथील जिल्हा कोषागार कार्यालयात  ई-कुबेर प्रणाली बाबत जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, डॉ.पंजाबराव देशमउख कृषी विद्यापीठ, जिल्हा परिषद इत्यादी शासकीय कार्यालयांचे कार्यालयप्रमुख व त्यांचे लिपिकांना सोमवारी (दि.२०) प्रशिक्षण देण्यात आले.

जिल्हा कोषागार अधिकारी मनजीत गोरेगावकर यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण देण्यात आले.  कार्यशाळेत ई कुबेर देयक प्रणाली संबंधी, विस्तृत मार्गदर्शन करून त्यामध्ये येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यात आले. ही प्रणाली जानेवारी २०२३ पासून कार्यान्वित झाली असून; यासंबंधीचा पायलट प्रोजेक्ट संपूर्ण राज्यस्तरावर अकोला जिल्हा कोषागारात यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. संबंधित कार्यालयांची प्रदाने त्याच दिवशी होऊन, रकमा तात्काळ संबंधितांचे खात्यात जमा होण्यास मदत होत आहे, तसेच निधी अखर्चित राहण्याचे, जमा खर्च लेखांकन करतांना होणाऱ्या त्रुट्या कमी होतील. या कार्यशाळेत जिल्हा कोषागार अधिकारी मनजीत गोरेगावकर, तसेच सहाय्यक लेखा अधिकारी, अप्पर कोषागार अधिकारी यांनी उपस्थितांना विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच शंकांचे निरसन करण्यात आले.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ