जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; ध्वनीक्षेपक, ध्वनीवर्धक वापर मर्यादा शिथील ठेवण्याचे दिवस निश्चित


अकोला,दि.9 (जिमाका)  वर्षातील १५ दिवसांसाठी ध्वनीची विहित मर्यादा कायम ठेवून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक यंत्रणा वापरासाठी परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने अकोला जिल्ह्यात ध्वनी प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक  यांनी प्रस्तावित केल्यानुसार, सन 2023 मध्ये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यासाठीची मर्यादा (ध्वनीची विहित मर्यादा राखून) शिथील ठेवण्याचे दिवस (15 दिवस) निश्चित करुन वापर करण्याची परवानगी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी एका आदेशाद्वारे दिली आहे.

ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यासाठी परवानगी देण्यात आलेले दिवस: 

रविवार दि. 19 फेब्रुवारी शिवजयंती, शुक्रवार दि. 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, सोमवार दि. 1 मे महाराष्ट्र दिन, गणपती उत्सवाचे तीन दिवस- बुधवार दि. 20 सप्टेंबर, शनिवार दि.23 सप्टेंबर,गुरुवार दि. 28 सप्टेंबर, नवरात्री उत्सव दोन दिवस- रविवार दि. 22 ऑक्टोबर  सोमवार दि. 23 ऑक्टोबर, रविवार दि. 12 नोव्हेंबर दिवाळी, सोमवार दि. 20 डिसेंबर ख्रिसमस, रविवार दि. 31 डिसेंबर.

 गणपती उत्सवातील पाचवा दिवस व गौरी विसर्जन तसेच अनंत चतुर्थी व ईद-ए-मिलाद हे सण एकाच दिवशी येत असल्याने एकूण 13 दिवस ऐवजी 11 दिवस होत आहेत. त्यामुळे उर्वरित चार दिवस हे महत्वाच्या कार्यक्रमांच्या परवानगी अर्जानुसार दिल्या जातील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.  

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ