मांगीलाल शर्मा विद्यालयात जनजागृती कार्यक्रम




अकोला,दि.2 (जिमाका)- महिला व बालविकास विभाग व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्यावतीने दि. 1 फेब्रवारी रोजी मांगीलाल शर्मा विद्यालय येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बालकल्याण समिती अध्यक्ष अॅड. अनिता गुरव यांनी बालकांचे हक्क अधिकार, चांगला स्पर्श वाईट स्पर्श याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर बाल न्याय मंडळाच्या सदस्य अॅड.वैशाली गावंडे यांनी सोशल मीडीयाचे दुष्परीणाम आपल्या अनुभव कथनातुन बालकांशी हितगुज गेले. तर जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर यांनी जिल्हयातील बाल संरक्षण यंत्रणा 1098 याबाबत माहीती दिली.

 कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा परीवीक्षा अधिकारी गिरीश पुसदकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंदना देशमुख यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक भानुदार येन्नेवार, धर्मेंद्र श्रीवास्तव, स्कॉउट कॅप्टन विप्लव राजगडकर, गाईड कॅप्टन अर्चना डिवरे, रेवत खाडे, व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षीका उपस्थित होते.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ