फेसलेस सेवांचा लाभ घ्यावा; उपप्रादेशीक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

 अकोला,दि.२१(जिमाका)- सारथी वाहन प्रणाली वर शिकाऊ अनुज्ञप्ती, वाहन प्रणालीवर नोंदणी प्रमाणपत्रातील बदल इ. सेवांसाठी फेसलेस सेवा उपलब्ध झाल्या असून वाहन व अनुज्ञप्तीधारकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले आहे.

यासंदर्भात उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  केंद्रशासनाच्या निर्देशानुसार सारथी प्रणालीवरील शिकाऊ अनुज्ञप्ती,  वाहन प्रणालीवरील  नोंदणी प्रमाणपत्रातील पत्ता बदल, दुय्यम योग्यता प्रमाणपत्र, कर्जबोजा कमी करणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, वाहनाचे ना हरकत प्रमाणपत्र,  वाहनाचे हस्तांतरण इ. कामांसाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.  या कामांसाठी फेसलेस सेवा उपलब्ध असून आधार क्रमांकाचा वापर करुन सेवांचा लाभ घेता येतो.  त्यासाठी  www.vahan.parivahan.gov.in  तसेच www.sarathi.parivahan.gov.in  या संकेतस्थळांचा वापर करावा, असेही कळविण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ