जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ साठी नोंदणी करण्याचे आवाहन

  अकोला,दि.२१(जिमाका)-  जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होत असते. व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा सन २०२४ मध्ये ल्योन (फ्रान्स) येथे होणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील पात्र युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपल्या कौशल्यांचे सादरीकरण करण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन   जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द. ल. ठाकरे यांनी केले आहे.

          यासंदर्भात अधिक माहिती अशी की, स्पर्धेच्या आयोजनासाठी व नोंदणीकरिता राज्यातील सर्व आयटीआय, तंत्रनिकेतन, सुक्ष्म व लघु उद्योग, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालये, आतिथ्य महाविद्यालये,  तंत्र विद्यालये, प्रशिक्षण संस्था, कला महाविद्यालये इ. प्रशिक्षण संस्थांची माहिती असणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेकडून राज्यातील प्रशिक्षण संस्थाची माहिती उपलब्ध होण्यासाठी google form तयार करण्यात आला आहे.

            यासंदर्भात नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपापल्या शैक्षणिक संस्थेशी संपर्क साधावयाचा आहे. संस्थेच्या प्राचार्यांनी ही ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे.         

           ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क माहितीः-

महात्मा गांधी नॅशनल फेलो समन्वय- ऋग्वेद ऐनापूरे.

 संपर्क क्रमांक– 8275369800

Email Id - mgnf_rugweda@iimnagpur.ac.in

 अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुसरा माळा, प्रशासकीय इमारत,जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अकोला, यांचेकडे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी 0724-2433849 तसेच भ्रमणध्वनी क्र. 9665775778 यावर संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  केंद्र द. ल. ठाकरे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ